'जय जय महाराष्ट्र माझा'चे दुसरे, तिसरे कडवेच राज्यगीत म्हणून गायले जाणार; शासनाने दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून 'गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताची निवड करण्यात आली. तर, फक्त दुसरे, तिसरे कडवेच का निवडले? यावर स्पष्टीकरणही देण्यात आले
'जय जय महाराष्ट्र माझा'चे दुसरे, तिसरे कडवेच राज्यगीत म्हणून गायले जाणार; शासनाने दिले स्पष्टीकरण
@CMOMaharashtra

मराठी माणसाच्या मनामनात बिंबवलेले 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्याच्या अभिमान गीताची निवड राज्यगीत म्हणून करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत हा निर्णय घेतला होता. मात्र, वेळेचा विचार करता 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत मोठे असल्याचे याचे दुसरे आणि तिसरे कडवेच राज्यगीत म्हणून गायले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाच्या समोर राज्यगीताचा बोर्डही लावण्यात येणार आहे. या राज्यगीताची वेळ १.४५ मिनिटे एवढी असणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावे, असा ठराव करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रासाठी ३ गीतांची निवड करण्यात आली होती. यामधून 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताची निवड करण्यात आली. गीतकार राजा बढे यांच्या लेखणीतून आलेल्या या गीताला शाहीर साबळे यांनी गायले आहे. याचे संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. १ मे १९६० रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळेंनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in