तुरुंग अधिकाऱ्याला धमकी प्रकरण: माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा

आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी अडचणीत सापडलेले माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला
तुरुंग अधिकाऱ्याला धमकी प्रकरण: माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा

मुंबई : आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी अडचणीत सापडलेले माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार तत्कालीन तुरुंग वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी गुरुवारी साक्ष देताना आपला जबाब फिरवला. रमेश कदम यांनी मला शिवीगाळ वा धमकी दिली नव्हती, असे डॉ. घुले यांनी सांगितले. याची दखल घेऊन सत्र न्यायालयाने मूळ तक्रारदाराला फितूर घोषित केले.

अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असताना रमेश कदम यांनी २४ फेब्रुवारी २०१६ रोजी आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप आहे. जे.जे. रुग्णालयात नेण्यासाठी गाडी उपलब्ध केली नाही, याचा राग मनात धरून कदम यांनी धमकी दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in