JEE मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहिले सत्र २१ ते ३० जानेवारी दुसरे सत्र १ ते १० एप्रिलदरम्यान

जेईई मेन्स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल २०२६ या दोन सत्रांमध्ये घेण्याची घोषणा एनटीएने यापूर्वीच जाहीर केले होते. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षेचे पहिले सत्र २१ ते ३० जानेवारी तर दुसरे सत्र परीक्षा १ ते १० एप्रिलदरम्यान होईल. प्रथम सत्र परीक्षेचे अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : देशातील आयआयटीसह अन्य राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी बंधनकारक असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मेन्स) २०२६ परीक्षेचे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) जाहीर केले आहे. ही परीक्षा दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे परीक्षेचे पहिले सत्र २१ ते ३० जानेवारी तर दुसरे सत्र १ ते १० एप्रिलदरम्यान होणार आहे.

जेईई मेन्स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल २०२६ या दोन सत्रांमध्ये घेण्याची घोषणा एनटीएने यापूर्वीच जाहीर केले होते. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षेचे पहिले सत्र २१ ते ३० जानेवारी तर दुसरे सत्र परीक्षा १ ते १० एप्रिलदरम्यान होईल. प्रथम सत्र परीक्षेचे अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठीची अर्जनोंदणी जानेवारी २०२६ च्या अखेरीस होणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र मिळावे यासाठी यंदा एनटीएने विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठीची आवश्यक लिंक https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही एनटीएकडून जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा-२०२६ संदर्भातील अधिक माहिती आणि सूचनांसाठी नियमितपणे एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ www.nta.ac.in आणि https://jeemain.nta.nic.in/ ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in