'जेईई मुख्य सत्र-२' ची परीक्षा २ एप्रिलला; विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांच्या शहरांची यादी जाहीर

जेईई मुख्य २०२६ च्या सत्र २ परीक्षेच्या तारखा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ही परीक्षा २ ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा देशातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांसह परदेशातील १५ शहरांमध्येही आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची माहिती विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
'जेईई मुख्य सत्र-२' ची परीक्षा २ एप्रिलला; विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांच्या शहरांची यादी जाहीर
Published on

मुंबई : जेईई मुख्य २०२६ च्या सत्र २ परीक्षेच्या तारखा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ही परीक्षा २ ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा देशातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांसह परदेशातील १५ शहरांमध्येही आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची माहिती विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, शहर विकास नियोजन या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली जेईई मुख्य सत्र-२ ची परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहेत. यात बी.ई./बी.टेक (पेपर १) परीक्षा २, ४, ५, ६ आणि ८ एप्रिल रोजी होणार आहे. तर बी.आर्क (पेपर २ ए) आणि बी.प्लॅनिंग (पेपर २ बी) तसेच दोन्ही पेपरसाठी परीक्षा ७ एप्रिल रोजी होणार आहे.

जेईई मुख्य २०२६ च्या सत्र २ ची परीक्षा भारतातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर तसेच देशाबाहेरील १५ शहरांमध्ये घेण्यात येणार आहे.या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती देण्यासाठी ‘एग्झाम सिटी इंटिमेशन स्लिप’ राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना https://jeemain.nta.nic.in/, https://jeemain.nta.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करून ही स्लिप डाउनलोड करून याबाबतची खातरजमा करावी, असे आवाहन राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केले आहे. ही स्लिप म्हणजे प्रवेशपत्र नसून, फक्त परीक्षा केंद्र असलेल्या शहराची माहिती देण्यासाठी असून यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्याची व त्या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था करणे शक्य होणार आहे. तर प्रत्यक्ष प्रवेशपत्र हे परीक्षेच्या काही दिवस अगोदर स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना स्लिप डाउनलोड करताना काही अडचण आल्यास त्यांनी ०११-४०७५९००० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा jeemain@nta.ac.in, mailto:jeemain@nta.ac.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in