रिक्षा प्रवाशादरम्यान सहा लाखांचे दागिने पळविले

हा प्रकार मालाड येथे उतरल्यानंतर लक्षात येताच तिने कुरार पोलिसांत तक्रार केली होती
रिक्षा प्रवाशादरम्यान सहा लाखांचे दागिने पळविले
Published on

मुंबई : रिक्षा प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतून सुमारे सहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करून पळून गेलेल्या वॉण्टेड रिक्षाचालकाला कुरार पोलिसांनी अटक केली. शिवप्रसाद ननकूराम यादव असे या आरोपीचे नाव असून तो बिहारचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी साडेसात लाखांचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. २६ नोव्हेंबरला सोनल सचिन भोसले ही महिला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते मालाड येथील लक्ष्मणनगर दरम्यान रिक्षाने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिच्या बॅगेतील सुमारे सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. हा प्रकार मालाड येथे उतरल्यानंतर लक्षात येताच तिने कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रिक्षाचालक शिवप्रसाद याला कांदिवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केली असता, त्यानेच या महिलेच्या बॅगेतील दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली.

logo
marathi.freepressjournal.in