जिअोच्या नवीन चेरमनपदाची झाली निवड, मुकेश अंबानी यांनी दिला राजीनामा

मुकेश अंबानी यांनी गत डिसेंबर महिन्यात कंपनीच्या नेतृत्व बदलावर भाष्य केले होते.
जिअोच्या नवीन चेरमनपदाची झाली निवड, मुकेश अंबानी यांनी दिला राजीनामा

जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असणारे मुकेश अंबानी यांनी ‘रिलायन्स जिओ’च्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांची जीअोच्या चेरमनपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीला संचालक मंडळानेही मंजुरी दिली आहे.

मुकेश अंबानी यांनी गत डिसेंबर महिन्यात कंपनीच्या नेतृत्व बदलावर भाष्य केले होते. ‘मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आणावे लागेल,’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर जिओची कमान नव्या पिढीकडे सोपवण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मुकेश अंबानी ६५ वर्षांचे आहेत. त्यांनी आपल्या भावी पिढीच्या हातात नेतृत्व देण्यासाठी रिलायन्स जिओच्या चेअरमनपदाची सूत्रे आकाश यांच्याकडे सोपवली आहे. मुंबई स्टॉक एक्स्चेंजला याबाबत रिलायन्स जिओ इन्फोकॉमने कळवले की, कंपनीची २७ जूनला बैठक झाली. यात कंपनीचे अकार्यकारी संचालक आकाश अंबानी यांची कंपनीचे चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.

तसेच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पंकज मोहन पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in