
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संख्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मलबार हिल येथे २.५ एकरवर पसरलेल्या ऐतिहासिक ‘जिना हाऊस’वरून राजकीय वातावरण तापवण्याचे प्रयत्न पडद्याआडून सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीवर मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी बैठक आयोजित केली होती. मात्र त्यात कोणताही निर्णय होऊ शकला नसल्याचे समजते.
शेलार यांनी सांगितले की, ही बैठक मालमत्तेच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी होती. ही मालमत्ता परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेने या संदर्भात एक निवेदन दिल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.
दरम्यान, या बैठकीत जिन्ना हाऊसच्या तत्काळ पाडकामाची चर्चा झाल्याचे समजते. मात्र ही मालमत्ता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे राज्य सरकारचा यावर कोणताही अधिकार नाही. भाजपप्रणीत एनडीए सरकारने जिन्ना हाऊस पाडण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप जाहीर केलेला नाही. उलट ही इमारत अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे तिची पुनर्बांधणी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. ही बैठक मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.