जिओला सहा वर्षे पूर्ण; डेटाचा वापर १०० पटीने वाढला

जिओ वापरकर्ते दरमहा सुमारे २० जीबी डेटा वापरतात, जो इंडस्ट्रीच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी जास्त आहे.
जिओला सहा वर्षे पूर्ण; डेटाचा वापर १०० पटीने वाढला

दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स जिओ ५ सप्टेंबर २०२२ रोजी लॉन्च झाल्याचा ६वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या सहा वर्षांत, दूरसंचार उद्योगाने दर महिन्याला सरासरी दरडोई डेटा वापरामध्ये १०० पट वाढ नोंदवली आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, जिओ लॉन्च होण्यापूर्वी प्रत्येक भारतीय ग्राहक एका महिन्यात केवळ १५४ एमबी डेटा वापरत होता. आता डेटा वापराचा आकडा १०० पटीने वाढून प्रति ग्राहक प्रति महिना १५.८ जीबी इतका आश्चर्यकारक स्तरावर पोहोचला आहे. दुसरीकडे जिओ वापरकर्ते दरमहा सुमारे २० जीबी डेटा वापरतात, जो इंडस्ट्रीच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी जास्त आहे.

मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत 5G लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 5G लाॅन्च झाल्यानंतर, डेटा वापरामध्ये मोठी वाढ असू शकते. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एरिक्सन मोबिलिटी रिपोर्टमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, 5G सुरू झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत डेटाचा वापर दुपटीने वाढेल. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, 5G तंत्रज्ञानाच्या उच्च कार्यक्षमता आणि उच्च गतीमुळे नवीन उद्योगांची भरभराट होईल, ज्यामुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते आकर्षित करतील. तसेच व्हिडीओंच्या मागणीत तीव्र वाढदेखील शक्य आहे. त्यामुळे डेटाची मागणी आणखी वाढणार आहे.

4G तंत्रज्ञान आणि स्पीडमध्ये रिलायन्स जिओचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. आता 5G बाबत कंपनीचे मोठे प्लॅन्सही समोर येत आहेत. कंपनी कनेक्टेड ड्रोन, कनेक्टेड अॅम्ब्युलन्स- हॉस्पिटल्स, कनेक्टेड फार्म्स-बार्न, कनेक्टेड स्कूल-कॉलेज, ईकॉमर्स इझी, अतुलनीय वेगाने मनोरंजन, रोबोटिक्स, क्लाउड पीसी, इमर्सिव टेक्नॉलॉजीसह व्हर्च्युअल थिंग्ज यांसारख्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सहा वर्षांपूर्वी जेव्हा जिओ लाॅन्च केले, तेव्हा कोणीही अंदाज लावू शकत नव्हते की, लॉन्च झाल्यानंतर काही वर्षांत जिओ देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक बनेल. आज जिओ ने ४१.३० दशलक्ष मोबाईल आणि सुमारे ७ दशलक्ष जिओ फायबर ग्राहकांसह भारतातील ३६ टक्के मार्केट शेअर व्यापला आहे. महसुलाच्या बाबतीत त्याचा वाटा ४०.३ टक्के आहे. जिओच्या स्वदेशी 5G तंत्रज्ञानामुळे, आगामी काळात काय बदल घडतील किंवा होऊ शकतील याचे चित्र कंपनीच्या गेल्या ६ वर्षांतील कामगिरीवरून दिसून येते.

मोफत कॉलिंग - मोबाइल बाळगण्याची किंमत कमी झाली. जिओने या देशात आउटगोइंग व्हॉईस कॉल विनामूल्य केले आहेत तेही सर्व नेटवर्कवर, ग्राहकांसाठी हा पहिला अनुभव होता. मोबाईल वापरणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. मोबाइल बिलातही मोठी घट झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in