

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल सेवा उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने शुक्रवारी प्रारंभिक समभाग विक्रीसाठी मसुदा दस्तावेज दाखल केला. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सार्वजनिक प्रस्ताव मानला जात असून, या माध्यमातून ४ अब्ज डॉलर म्हणजेच साधारण ३७,७०० कोटी रुपये उभारण्याचा अंदाज आहे. मसुदा प्रस्तावानुसार, जिओ प्लॅटफॉर्म्स २७ कोटी नवीन शेअर्स बाजारात आणणार आहे. भागविक्री पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या २.९ टक्के असेल. कंपनीने २०२० मध्ये जगातील मोठ्या तंत्रज्ञान आणि खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते.
एकूण उभारणी : ३७,७०० कोटी रुपये
एकूण मूल्य : भागविक्रीनंतर जिओ प्लॅटफॉर्म्सचे एकूण बाजार मूल्य १३७ अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे.
ऐतिहासिक स्थान : रिलायन्स समूहाकडून २००८ नंतर आलेली ही पहिलीच सार्वजनिक भागविक्री आहे आणि ग्राहक-केंद्रित कंपनीसाठी समूहाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.