जितेंद्र आव्हाड म्हणाले, हनुमान जयंती, रामनवमी हे दंगली घडवण्यासाठीच; सुप्रिया सुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी केली टीका
जितेंद्र आव्हाड म्हणाले, हनुमान जयंती, रामनवमी हे दंगली घडवण्यासाठीच; सुप्रिया सुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामध्ये पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, "रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असे वाटायला लागले आहे." यानंतर आता राज्यात याचे पडसाद उमटू लागले असून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या शिबीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जिंद आव्हाड म्हणाले की, "“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. खरे तर येणारे वर्ष हे जातीय दंगलींचे वर्ष असेल, कारण सत्ताधारी देशातील तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही. रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असे वाटायला लागले आहे."

एकीकडे सत्ताधारी पक्षांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मन मोकळे कार्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जर कोणी काही विधान केले असेल, तर त्यावर लगेच गुन्हा दाखल करणे चुकीचे. सर्वच राजनेत्यांनी ही पद्धत थांबवली पाहिजे. कोणीही काहीही बोलले असेल, तर लगेच गुन्हा दाखल न करता आपण सर्वांनी मिळून तारतम्य बाळगले पाहिजे, लगेच गुन्हा दाखल करणे यावर विचार केला पाहिजे." असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in