जितेंद्र आव्हाडांवर मोक्का लावून तडीपार करा; भाजपच्या तुषार भोसलेंची मागणी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर भाजप अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी केली टीका
जितेंद्र आव्हाडांवर मोक्का लावून तडीपार करा; भाजपच्या तुषार भोसलेंची मागणी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या शिबिरामध्ये वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, 'रामनवमी आणि हनुमान जयंती हे दंगली घडविण्यासाठीच झाले आहेत का? असा प्रश्न पडतो.' त्यांनी केलेल्या या विधानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली असून त्यांच्या विरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. यावर भाजप अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी आक्षेप घेत टीका केली की, "जितेंद्र आव्हाड नावाचा मनुष्य हा वारंवार, जाणीवपूर्वक हिंदू धर्माला लक्ष करत असतात. जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या सण उत्सवांना बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सरकारने त्यांच्यावर मोक्का लावून तडीपार करावे," अशी मागणी केली आहे.

भाजपचे नेते तुषार भोसले म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक हिंदू धर्माला लक्ष करतात. आता तर रमजानच्या कालावधीमध्ये असे म्हणाले की, राम नवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच असतात, येणाऱ्या वर्ष हे दंगलींचे वर्ष असेल, हे म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे कटकारस्थान आहे. जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या उत्सवांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे." अशा भावना व्यक्त करत त्यांनी टीका केली. दरम्यान, यावर जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून भाजपने त्यांच्याविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in