Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचे छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर वाद; भाजप - राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर आता भाजप आक्रमक, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनीही प्रतिआंदोलन केले
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचे छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर वाद; भाजप - राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधानावरून भाजप युवा मोर्चाने जोरदार विरोध केला. यावेळी भाजप युवा मोर्चाने आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवून काहींना अटकदेखील करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिआंदोलन करत उत्तर दिले. यावेळी, जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर फिरू न देण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाने दिला.

“रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिल शाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा," असे वादग्रस्त ट्‌वीट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांनी केले होते.

आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईमधील प्रदेश कार्यालयावर आंदोलन घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र पोलिसांनी काही अंतरावर अडवत वेळीच हस्तक्षेप करत रोखले. पोलिसांनी रोखल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुतळा नष्ट करुन काहींना अटक केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपचा निषेध केला. यामुळे काहीकाळ मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in