ED ला हायकोर्टाचा झटका; ७३५८ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या सुटकेचे आदेश

तब्बल ७३५८ कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र पांडेची अटक उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आणि पांडेची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मोठा झटका बसला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.
ED ला हायकोर्टाचा झटका; ७३५८ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या सुटकेचे आदेश
ED ला हायकोर्टाचा झटका; ७३५८ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या सुटकेचे आदेश संग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : तब्बल ७३५८ कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र पांडेची अटक उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आणि पांडेची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मोठा झटका बसला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

ईडीने जितेंद्र पांडेवर बनावट कंपन्या आणि बँक खात्यांचा वापर करून सुमारे ७,३५८ कोटी रुपयांचे बेकायदेशीर परकीय चलन परदेशात पाठवल्याचा (हवाला रॅकेट) आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने २३ जून रोजी पांडेला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला ईडी आणि न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

संबंधित कोठडीच्या आणि अटकेच्या आदेशाला पांडेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. एकलपीठाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर याचिकाकर्त्या पांडेला दिलासा दिला. जितेंद्र पांडेने गेल्या १८ महिन्यांत तब्बल ३८ वेळा ईडीसमोर हजर राहून आपले जबाब नोंदवले होते आणि तपासात पूर्ण सहकार्य केले होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in