वाढवण पोर्टसाठी जेएनपीए-टीआयएलमध्ये सामंजस्य करार

वाढवण बंदराच्या बांधकामासाठी जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जेएनपीए) सोमवारी टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (टीआयएल) सोबत सामंजस्य करार केला आहे.
वाढवण पोर्टसाठी जेएनपीए-टीआयएलमध्ये सामंजस्य करार
एक्स @VadhvanPort
Published on

मुंबई : वाढवण बंदराच्या बांधकामासाठी जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जेएनपीए) सोमवारी टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (टीआयएल) सोबत सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य करारावर जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, आणि सीएमडी, वाप प्रकल्प लिमिटेड व कॅप्टन दीपक तिवारी स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारानुसार टीआयएलने वाढवण बंदर आणि आसपासच्या परिसराच्या विकासासाठी अंदाजे २० हजार कोटी गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड एसएआरएलसह भारताच्या सागरी विकासासाठी आपली दृढ वचनबद्धता प्रदर्शित करत आहे.

यावेळी जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ म्हणाले की, टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड एसएआरएलसोबतचा सामंजस्य करार हा आमच्या दृष्टिकोनात भारतातील बंदराच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी तयार असलेल्या वाढवण बंदरासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या भागीदारीमुळे केवळ भारताच्या सागरी क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे एकत्रिकरण सुनिश्चित करते.

logo
marathi.freepressjournal.in