जोगेश्वरीतील चाळीत भीषण आग; ११ जण जखमी

जोगेश्वरी (पश्चिम) येथील वैशाली नगरमधील गोमती वैशाली चाळ या इमारतीच्या तळमजल्यावरील वीज मीटर केबिनमध्ये लागलेल्या आगीत ११ जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ५.५९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळात ही आग वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात धुराचे लोट पसरले.
जोगेश्वरीतील चाळीत भीषण आग; ११ जण जखमी
जोगेश्वरीतील चाळीत भीषण आग; ११ जण जखमी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : जोगेश्वरी (पश्चिम) येथील वैशाली नगरमधील गोमती वैशाली चाळ या इमारतीच्या तळमजल्यावरील वीज मीटर केबिनमध्ये लागलेल्या आगीत ११ जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ५.५९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळात ही आग वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात धुराचे लोट पसरले.

या घटनेत पती-पत्नीसह एकाच कुटुंबातील ७ तर अन्य एका कुटुंबातील दोन असे एकूण ११ जण जखमी झाले असून त्यांना कूपर व ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जोगेश्वरी (पश्चिम) येथील वैशाली नगर मधील गोमती वैशाली चाळ ही तळ अधिक सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि अग्नी भडका उडाला. इमारतीत धुराचे लोट पसरल्याने काही रहिवासी आत अडकले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in