
मुंबई : मुंबईतील अनेक कामांच्या निविदा काढून त्यांचे कमिशन लाटायचे, असा एकमेव उद्योग पालिकेकडून सुरू आहे. अंधेरी (गाव) येथील सीटीएस नं. २०७ वर सुरू असलेल्या बांधकामांना त्वरित स्थगिती देऊन त्याची स्वतंत्र चौकशी करावी. तसेच, जुहू लेन/बर्फीवाला रोडजवळील ४४९७. १० चौ. मी. क्षेत्रफळ असलेल्या भूखंड व्यवहारात १२०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास विभाग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना याबाबत पत्र पाठवले आहे.
या मागण्या!
कायद्याचे उल्लंघन करत परवानगी दिलेल्या दोन्ही योजना रद्द कराव्यात. ८५ झोपडीधारकांना कायमस्वरूपी घरे मिळेपर्यंत भाडे किंवा संक्रमण शिबीर द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.