मुंबई ३० दिवसांत खड्डे मुक्त करा! सहायक आयुक्त आणि अभियंत्यांना १५ जुनची डेडलाईन

२ लाख १० हजार चौरस मीटरचे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात ८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार
मुंबई ३० दिवसांत खड्डे मुक्त करा! सहायक आयुक्त आणि अभियंत्यांना १५ जुनची डेडलाईन
Published on

वाहनांची सतत ये-जा सुरू असल्याने मुंबईतील रस्ते खड्डे मय होतात. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जूनपर्यंत खड्डे बुजवा, असे आदेश सहायक आयुक्त व रस्ते विभागातील अभियंत्यांना दिल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितले. दरम्यान, २ लाख १० हजार चौरस मीटरचे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात ८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, खड्डे मुक्त रस्ते यासाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर रस्ते कामे, खड्डे बुजवणे व नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. मुंबईतील रस्ते खड्डे मुक्तीसाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापर करण्यात आला आहे. मात्र रि अॅक्टिव्ह अस्फाल्ट रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पालिकेच्या २४ वॉर्डातील रस्ते खड्डे मुक्तीसाठी २.७५ कोटी ते ५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चार हजार रुपये प्रती चार चौरस मीटर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये खड्डे बुजवण्याचे काम मुंबई महापालिका करत असते. मात्र यावर्षी रस्त्याचे खराब पॅच दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील आणि मुंबईकरांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

वॉर्डनुसार निधीची तरतूद

ए, बी, सी, डी, ई - १५ कोटी

एफ साऊथ, एफ-उत्तर, जी-दक्षिण, जी-उत्तर - १२ कोटी

एच-पूर्व, एच-पश्चिम, के-पूर्व - ९ कोटी

पी-दक्षिण, पी-उत्तर, के पश्चिम - १५ कोटी

आर-दक्षिण, आर-उत्तर, आर मध्य - १५ कोटी

एल, एम-पूर्व, एम-पश्चिम - ९ कोटी

एन, एस, टी - ९ कोटी

प्रति झोन खर्च ( कोटीत)

शहर - २७ कोटी

पश्चिम उपनगरे - ३९ कोटी

पूर्व उपनगरे - १८ कोटी

एकूण - ८४ कोटी रुपये

logo
marathi.freepressjournal.in