टाटा-एअरबसवरून राज्यात काहूर माजवण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

टाटा-एअरबस हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
टाटा-एअरबसवरून राज्यात काहूर 
माजवण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

‘आज राज्यात टाटा-एअरबसवरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उद्योगमंत्री उत्तर देत आहेत, योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरे देईन’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले.

वेदांता-फॉक्सकॉननंतर टाटा-एअरबस हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये पत्रकारांशी बोलतानामुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘टाटा-एअरबसवरून विरोधकांचा जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मीही उत्तरे देईन. भविष्यात राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे’.

ते पुढे म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जे प्रकल्प सुरू करण्यात आले होते त्यांना गेल्या अडीच वर्षांत स्थगिती देण्यात आली होती. ते प्रकल्प आम्ही सत्तेत आल्यानंतर पुन्हा सुरू केले आहेत’.

शेतकऱ्यांना सर्वात मोठी

नुकसानभरपाई आम्ही दिली

शेतकऱ्यांच्या मदतीवरून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ‘आज राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही जी नुकसानभरपाई दिली आहे ती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी नुकसानभरपाई आहे. आमच्या मंत्रिमंडळाने नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली आहे. जे शेतकरी निकषात बसत नव्हते, त्या शेतकऱ्यांनाही आम्ही मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सहा हजार कोटींची नुकसानभरपाई दिली. त्यामुळे त्यांनी आकडे पाहावे आणि टीका करावी’.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in