ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन; परळ वर्कशॉपसह मुंबईतील रस्ते भक्तांनी फुलले

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी परळ वर्कशॉपसह मुंबईतील रस्ते भक्तांनी फुलले होते. बाप्पाचे आगमन, भाविकांची गर्दी लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने बस मार्गांत बदल केले होते.
Ganpati Murti
ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन
Published on

मुंबई : खेतवाडीचा मोरया, काळा चौकीचा महागणपती, अंधेरीचा विघ्नहर्ता, परळचा मोरया अशा विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचे रविवारी ढोल- ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी परळ वर्कशॉपसह मुंबईतील रस्ते भक्तांनी फुलले होते. बाप्पाचे आगमन, भाविकांची गर्दी लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने बस मार्गांत बदल केले होते.

देशभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मात्र मुंबईत बाप्पाचा उत्साह वेगळाच अनुभवायला मिळतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात तर दोन-तीन महिने आधीच बाप्पाच्या स्वागतासाठी, मंडप सजावटीसाठी भक्तांची लगबग सुरू असते. लाडक्या गणरायाचे ७ सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवास महिनाभराहून कमी कालावधी शिल्लक आहे.‌ त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे.

दरम्यान, मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. यापैकी बहुतांश मंडळात मंडप सजावट, विद्युत रोषणाई अशी कामे महिनाभर आधीच हाती घेतली जातात. बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही मंडळांत सजावटीचे काम हाती घेण्यात येते. त्यामुळे मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत महिनाभर आधीच बाप्पाचे आगमन होते.

logo
marathi.freepressjournal.in