Kalyan : प्रियकराने जीव दिल्याच्या गैरसमजाने प्रेयसीचीही तलावात उडी, मृत निघाला तिसराच; कल्याणमधील घटना

तलावात एका तरुणाने उडी घेतली आहे, हे ऐकून एका तरुणीनेही तलावात उडी मारली. आपल्या प्रियकराने तलावात उडी घेतली असे तिला वाटले होते. पण, तो तिचा प्रियकर नव्हताच.
Kalyan : प्रियकराने जीव दिल्याच्या गैरसमजाने प्रेयसीचीही तलावात उडी, मृत निघाला तिसराच; कल्याणमधील घटना

कल्याणमधून समोर आलेली एक विचित्र घटना चर्चेत आहे. तलावात एका तरुणाने उडी घेतली आहे, हे ऐकून एका तरुणीनेही तलावात उडी मारली. आपल्या प्रियकराने तलावात उडी घेतली असे तिला वाटले होते. पण, तो तिचा प्रियकर नव्हताच. सुदैवाने या तरुणीला तलाव परिसरातील शुभम शेट्ये या धाडसी तरुणाने वाचविले. मात्र, ज्या तरुणाला बघून या तरुणीने मारली होती तो महेश भाटिया हा पोहण्यासाठी गेला होता. तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला.

कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात सोमवारी सायंकाळच्या सुमारास महेश भाटिया हा तरुण पोहण्यासठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्यानंतर अग्निशमन विभाग व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. पण, दुसरीकडे अग्निशमन दल पोहोचण्याआधीच एका तरुणाने उडी मारल्याचे एकताच एका तरुणीनेही तलावात उडी मारली. तलाव परिसरात राहणाऱ्या शुभम शेट्ये नावाच्या तरुणाने धाडस दाखवत तिला वाचवले.

प्रियकर म्हणाला आमच्यात गैरसमज झाला होता-

तरुणीने बाहेर येताच सांगितले की, तिच्या प्रियकराने तलावात उडी मारली म्हणून मीही उडी मारली. परंतु, तरुणीच्या आधी तलावात उडी मारणारा तिचा प्रियकर नव्हता. तो महेश भाटिया हा तरुण होता. तो तलावात पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर तिचा प्रियकर समोर आला. आमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला होता असे त्याने सांगितले. दोघांमध्ये नेमका काय गैरसमज झाला होता हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, हा घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले. ही विचित्र घटना आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in