अतिक्रमणामुळे कर्नाक पुलाचे काम रखडले पुनर्बांधणीच्या कामात विलंब

अतिक्रणांच्या अडथळ्यांची शर्यत करावी लागत असल्याने पुलाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे
अतिक्रमणामुळे कर्नाक पुलाचे काम रखडले पुनर्बांधणीच्या कामात विलंब

मुंबई : मुंबईतील १५० वर्षें जुना पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २०१८ मध्ये आयआयटीने केलेल्या सुरक्षा ऑडिट नंतर पूल बंद करत पुनर्बांधणीची सूचना केली होती; मात्र पुला शेजारी अतिक्रमणाचा विखळा बसल्याने पुलाचे काम रखडले आहे.

जुन्या ब्रिटिशकालीन कर्नाक पूलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यानचा हा कर्नाक पूल सुमारे १५४ वर्षे जुना आहे. पुलाच्या पोलादी संरचनेत मोठ्या प्रमाणात झीज झाल्यामुळे नोव्हेंबर २०१३ पासून या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. २०१८ मध्ये आयआयटीने केलेल्या सुरक्षा ऑडिटनंतर हा पूल बंद करून पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली. मात्र दक्षिण मुंबईतील मशिद बंदर, सीएसएमटी, महम्मद अली रोड येथील व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी हा पूल महत्वाचा आहे. मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडून मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांची पुनर्बांधणी केली जात आहे. सध्या कर्नाक बंदर आणि भायखळा पुलांची पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आली आहे; मात्र या पुलांच्या खाली असणारी अतिक्रमणे तसेच व्यावसायिक गाळे या कामात अडथळे ठरत आहेत. एकूण १२ अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत. ही बांधकामे हटवल्यानंतरच पूलाच्या कामाला वेग येईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. दरम्यान जून २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे; मात्र अतिक्रणांच्या अडथळ्यांची शर्यत करावी लागत असल्याने पुलाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in