
एमसीए १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक स्पोर्टिंगने विजेतेपद पटकाविले. मरिन ड्राइव्ह येथील मुंबई पोलीस जिमखाना मैदानात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी पारसी जिमखाना संघावर आठ विकेट्स राखून मात केली.
मॅनग्रोल स्पोर्ट्स क्लब आयोजित तसेच पल्स स्पोर्ट्स इव्हेंट्स इंटरटेन्मेंट यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कर्नाटक एसएने प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यांच्या गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी मारा करताना पारसी जिमखाना संघाला २५.३ षट्कांत १०१ धावांत गुंडाळले. कर्नाटक एसएच्या फलंदाजांनी विजयासाठीचे १०२ धावांचे आव्हान १९.५ षट्कांत दोन विकेटच्या माध्यमाने साध्य केले.