काशीमीरा इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणी पप्पू पेजरला अटक; तीन वर्षानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून घेतले ताब्यात

मिरा भाईंदर शहरातील काशीमिरा पोलीस ठाण्यासमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या 'इंटरनॅशनल बेकिंग बेकरी' मध्ये १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास गोळीबार करण्याचा प्रयत्नानंतर फरार झालेला आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजर यास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
काशीमीरा इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणी पप्पू पेजरला अटक; तीन वर्षानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून घेतले ताब्यात
Published on

भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील काशीमिरा पोलीस ठाण्यासमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या 'इंटरनॅशनल बेकिंग बेकरी' मध्ये १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास गोळीबार करण्याचा प्रयत्नानंतर फरार झालेला आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजर यास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तर सदरी आरोपीला अटक केल्याने स्थानिक लोकांचा सहभाग व रेकी कोणी केली. त्यात गोळीबार करण्यासाठी कोणी सुपारी दिली याची चौकशी होऊन अजून कोणाचा सहभाग आहे का हे बाहेर येणार आहे.

संघटीत गुन्हेगारी टोळीचे कारस्थान उघड

काशिमीराच्या बेकरीत तक्रारदार चंद्रकांत कोंडगुले हे कामावर असताना अनोळखी आरोपीने त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने पिस्टल ताणून फायर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आरोपीचे पिस्टल लॉक झाल्याने पिस्टल मधून गोळी फायर न-झाल्याने तो पळून गेला होता. याप्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलीसांनी गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा संघटीत गुन्हेगारी टोळीने कट-कारस्थान करून केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये पोलीस आयुक्तांच्या आदेशाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत मकोका लावण्यात आला होता व त्याचा तपास मिरारोड सहायक पोलीस आयुक्त करत होते.

मोक्का अंतर्गत कारवाई; तिघां विरोधात दोषारोपपत्र

सदरील गुन्ह्यात सामील आरोपींनी पालघर, मुंबई सह मीरा - भाईंदर शहरात अवैध गुटखा पुरवठा करण्यासाठी आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी बेकरीत गोळीबार करण्याचा प्रयत्न करून दहशत माजविणाऱ्या संघटित गुन्हेगार पप्पू पेजर, अक्तर मर्चंट, अकबर अली, मुन्ना पठाण, इम्रान शेख यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, तसेच तिघांच्या विरोधात दोषारोपपत्र ठेवले असून पप्पू पेजर फरार होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे, तर अक्तर मर्चंट हा अजूनही फरार असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

१० दिवसांची कोठडी

सदर गुन्हयातील मुख्य आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजर हा गुन्हा घडल्यापासून परदेशात पळून गेला होता, तो बुधवारी ११ मार्च रोजी विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता, अशी माहिती प्राप्त झाली.

सदर कारवाईत यांचा सहभाग

तर सदरची कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे व योगिता बाविस्कर, सहायक फौजदार अविनाश गर्जे, पोलीस शिपाई धीरज मेंगाने, मसुबचे किरण आसवले यांनी केलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in