स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल

मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयाच्या नावावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. ‘राजे एडवर्ड’ हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असल्याची सूचना सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट)चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतःच्या प्रकल्पांना ‘राम कुटीर’ नाव का दिलं नाही, असा थेट सवाल त्यांनी लोढा यांना केला आहे.
स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल
स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल
Published on

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि लाखो रुग्णांसाठी आधार असलेल्या के. ई. एम. रुग्णालयाच्या नावावरून आता नवा राजकीय वाद पेटला आहे. रुग्णालयाच्या नावातील राजे एडवर्ड हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असल्याची सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर देताना स्वतःच्या प्रकल्पांना राम कुटीर नाव का दिले नाही, असा सवाल लोढा यांना केला आहे.

कोल्हेंचा टोला

लोढा यांना या संस्थेचा इतिहास नीट माहिती नसावा. पारतंत्र्याच्या काळासुद्धा भारतीय डॉक्टरच असावेत असे अंमलात आणणारे हे केईएम रुग्णालय आहे. मुंबईत फक्त पाच वैद्यकीय महाविद्यालये मुंबई पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यातील चारची स्थापना १९५० पूर्वी झाली. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षाच्या काळात आपण केवळ एका मेडिकल कॉलेजची भर घालू शकलो आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची वस्तुस्थिती काय आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबईतील लोकसंख्या २ कोटी आहे आणि उपलब्ध बेडची संख्या ५० हजार आहे. यातील केवळ १५ हजार बेड हे महापालिकेच्या रुग्णालयातील आहेत, असे कोल्हे म्हणाले.

लोढा यांच्या बांधकाम प्रकल्पांची नावे लोढा बेलमोंडो, लोढा बेलाजिओ, अल्टामाऊंट, कासा बेला, ट्रम्प टॉवर अशी आहेत. मग ही नावे कुठल्या मातीतील आहेत. त्याऐवजी तुम्ही राम कुटीर, सीता सदन, लक्ष्मी निवास अशी आपल्या मातीमधील नावे का नाही ठेवली, असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी लोढा यांना विचारला आहे.

logo
marathi.freepressjournal.in