
मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम. रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात शेकडो परिचारिकांनी आंदोलन केले. हॉस्पिटलबाहेरील जागेत शेकडो परिचारिका एकत्र आल्या आणि त्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यामुळे काहीकाळ रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली होती. नर्स आणि वार्डबॉय यांनीही या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला.
के.ई.एम. रुग्णालयाच्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वी नोटीस काढत परिचारिकांना नर्स क्वार्टर रिकामे करण्यास सांगण्यात होते. तसेच त्यांना टीबी रुग्णालयामध्ये स्थलांतरीत होण्यास सांगितले होते. याला परिचारिकांचा विरोध होता. त्यामुळे शेकडो परिचारिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच रुग्णालयातील कामकाज ठप्प करत आंदोलन केले.