केतकी चितळेला उच्च न्यायालयाचा दिलासा,तूर्तास अटक नाही

राज्य सरकारने दिल्यानंतर न्यायालयाने याचिकेची सुनावणी १२ जुलैपर्यंत तहकूब ठेवली.
 केतकी चितळेला उच्च न्यायालयाचा दिलासा,तूर्तास अटक नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांविरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळेला सोमवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. केतकीविरोधात राज्यात विविध २१ ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हामध्ये तिला अटक केली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारने दिल्यानंतर न्यायालयाने याचिकेची सुनावणी १२ जुलैपर्यंत तहकूब ठेवली.

अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत लिहिलेली कविता फेसबुकवर पोस्ट केली. या विकृत पोस्ट प्रकरणी कळव्यातील स्वप्नील नेटके या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी याप्रकरणी केतकी चितळेला १४ मे रोजी अटक केली. केतकी विरोधात राज्यात अनेक ठिकाणी २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर केतकीला १८ मे रोजी ठाणे न्यायालयात सादर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने तिला १४ दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे म्हणून केतकीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

आपल्याला पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली असून गुन्हा रद्द करण्यात यावा तसेच चुकीच्या पद्धतीने अटक केल्याने भरपाई देण्याचे न्यायालयाने आदेश द्यावेत अशी मागणी तिने याचिकेत केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन आर बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्यावतीने अ‍ॅड अरूणा कामत पै यांनी केतकी विरोधात २२ विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात एका प्रकरणी जामीन मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in