केतकी चितळेला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

केतकी चितळेला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर अपशब्द वापरणे केतकी चितळेला महागात पडले आहे. कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्ह्यानंतर तिला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने कळंबोली परिसरातून अटक केली. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात केतकी चितळे हिला हजर केले असता तिला १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयात केतकी चितळे हिने कोणताही वकील न करता स्वतः युक्तीवाद केला. या युक्तिवादामध्ये मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून मी कोणत्याही राजकीय पक्षांची नाही, असे यावेळी तिने न्यायालयात सांगितले.

केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर अपशब्द वापरले. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीकादेखील करण्यात आली. दरम्यान, कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चितळे हिला अटक करा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली असता ठाणे पोलिसांनी तिचा ताबा घेतला. रविवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असताना न्यायालयाबाहेर केतकीला धक्काबुक्की आणि अंडी फेकण्याचा प्रकार घडला. दरम्यान, ठाणे न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in