खारकोपर-उरण ४० लोकल फेऱ्या आजपासून

खारकोपर ते उरण मार्गासाठी १४३३ कोटी रुपये खर्च आला. या रेल्वेमुळे विद्यार्थी, व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
खारकोपर-उरण ४० लोकल फेऱ्या आजपासून

मुंबई : खारकोपर-उरण दरम्यान ४० लोकल फेऱ्या आजपासून चालवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद‌्घाटन शुक्रवारी झाले. सध्या नेरुळ-बेलापूर ते खारकोपर दरम्यान रोज ४० सेवा चालवल्या जातात. (येता-जाता २०-२० फेऱ्या) आता ही सेवा उरणपर्यंत नेली जाणार आहे. शेमतीखार, न्हावा शेवा, द्रोणागिरी आदी स्टेशन या मार्गावर असतील. हा नवीन मार्ग १४.६० किमीचा आहे. बेलापूर-उरण मार्गासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च आला. त्यातील ३३ टक्के वाटा रेल्वे तर ६७ टक्के वाटा सिडकोने उचलला आहे. तर खारकोपर ते उरण मार्गासाठी १४३३ कोटी रुपये खर्च आला. या रेल्वेमुळे विद्यार्थी, व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in