खिचडी घोटाळा : शिवसेनेच्या सूरज चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी 

राजकारणी आणि महापालिका अधिकाऱ्याशी जवळीक असल्यामुळे चव्हाण यांनी फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला करार मिळवून देण्यास मदत केली
खिचडी घोटाळा : शिवसेनेच्या सूरज चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी 

मुंबई : खिचडी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी शिवसेनेचे (यूबीटी) पदाधिकारी सूरज चव्हाण यांना येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

 सेनेचे (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे सहकारी चव्हाण यांना केंद्रीय तपास यंत्रणेने १७ जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीची कोठडी संपल्यानंतर चव्हाण यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपास यंत्रणेने पुढील कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मनी लाँड्रिंग प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालातून उद्भवले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ महामारीच्या काळात शहरात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना 'खिचडी' पॅकेट पुरवण्याचे कंत्राट दिले तेव्हा नियमांचे उल्लंघन झाले.

बडे राजकारणी आणि महापालिका अधिकाऱ्याशी जवळीक असल्यामुळे चव्हाण यांनी फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला करार मिळवून देण्यास मदत केली आणि व्यवहारातून १.३५ कोटी रुपयांचा गैरफायदा घेतला गेला, असा ईडीचा दावा आहे.

logo
marathi.freepressjournal.in