खंडणीसाठी बिल्डरचे अपहरण; आरोपीला अटक

याप्रकरणी गुन्हा नोंद होताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या परिसरातून पाचजणांना अटक केली होती.
खंडणीसाठी बिल्डरचे अपहरण; आरोपीला अटक
Published on

मुंबई : भायखळा येथील एका बिल्डरचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी दहा कोटीची खंडणीची मागणी केल्याच्या कटातील सहाव्या आरोपीस खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मध्यप्रदेशातून अटक केली. मजहर शाकीर ऊर्फ शानू शाह असे या आरोपीचे नाव असून, तो मध्यप्रदेशच्या इंदौर, श्रीनगर काकडचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने सोमवार ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहे. माझगावचे रहिवाशी असलेल्या एका बिल्डरचे गेल्या आठवड्यात एका टोळीने अपहरण केले होते. त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे दहा कोटीची मागणी केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या परिसरातून पाचजणांना अटक केली होती. त्यात वाजिद यासीन शेख, करीम वाजिद खान, आलमगीर अलीमुद्दीन मलिक, मोहम्मद इलियास अब्दुल अजीज खान ऊर्फ इलियास बचकाना, नौशाद अकबरअली शेख यांचा समावेश होता.

logo
marathi.freepressjournal.in