
मुंबई : वांद्रे येथे एका महिलेने स्वतच्या १० वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अभिलाषा रवींद्र औटे या ३६ वर्षांच्या आरोपी महिलेस हत्येचा गुन्हा दाखल होताख खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.
अभिलाषा हिला स्क्रिझोफेनिया हा आजार असून या आजारातून ती अनेकदा आक्रमक होत असल्याने तिने तिच्या मुलाची हत्या केल्याचे सांगितले जाते. रवींद्र दिगंबरराव औटे हे गृह विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांची पत्नी अभिलाषा आणि दहा वर्षांचा मुलगा सर्वेश यांच्यासोबत वांद्रे येथील वाय कॉलनीतील मजल्यावरील रुम क्रमांक ८० मध्ये राहत होते. पत्नी अभिलाषा ही आजारी असून तिला स्क्रिझोफेनिया आजार आहे. या आजारामुळे ती अनेकदा आक्रमक होते. गुरुवारी सायंकाळी ती मुलासोबत घरी होती. रात्री दरवाजा बंद करून तिने सर्वेशची वायरने गळा आवळून हत्या केली.