विषप्रयोग करत झाडांची हत्या?

विकासकाविरोधात गुन्हा
विषप्रयोग करत झाडांची हत्या?

मुंबई : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या पालिकेच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत मुलुंड येथील विकासकाने ११ झाडे विषप्रयोग करून मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल घेत मुलुंड येथील पालिकेच्या टी वॉर्डने विकासकाविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. त्यामुळे अधिकाधिक वृक्षारोपण करण्यात यावे, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात येते. मात्र मुलुंड येथे इमारतीच्या दर्शनी भागात झाडांचा त्रास होत असल्यामुळे संबंधित विकासकाने झाडांवर विषप्रयोग केल्याची तक्रार मुलुंड येथील सामाजिक कार्यकर्ते ॲॅड. सागर देवरे यांनी पालिकेच्या उद्यान विभागाकडे केली होती. त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळेस ३ अशोक, २ काळा उंबर, ३ नारळ, १ आंबा आणि १ काटेसावर अशी एकूण ११ झाडे मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in