आता सोमय्यांची नजर रविंद्र वायकर यांच्या हॉटेलवर; सीबीआय चौकशी करण्याची केली मागणी

याप्रकरणी सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत
आता सोमय्यांची नजर रविंद्र वायकर यांच्या हॉटेलवर; सीबीआय चौकशी करण्याची केली मागणी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. आधी मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्या नंतर सोमय्या यांनी आपला मोर्चा उद्धव ठाकरे यांचे खास असलेल्या रवींद्र वायकर यांच्याकडे वळवला आहे. सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आशिर्वादाने वायकर यांना २०२१ मध्ये जोगेश्वरीच्या व्यारवली गावात २ लाख स्के.फु.चे ५ स्टार हॉटेल बांधकाम करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली होती. खेळाचे मैदान म्हणून ही जागा आरक्षित होती. या जागेवर वायकर यांनी ५०० कोटी रुपयांच्या किंमतीचे हॉटेल उभारले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

वायकर यांनी ९ फेब्रुवारी २००४ साली या जागेवर खेळाच्या मैदानाचा १५ % काही भाग स्पोर्ट्स एज्युकेशन सेंटर म्हणून विकसीत करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्या समोरच्या जमिनीवर कायमचे मैदान आरक्षित ठेवण्यात येणार होते. या मैदानाचा रिक्रिएशन ग्राउंड म्हणून वापर केला जाईल असं वचन त्यांनी महापालिकेला दिलं होतं. याबाबत महापालिका, वायकर आणि महल पिक्चर्स प्रा. लि. या अविनाश भोसले व शहीद बालवा यांच्या मालकीच्या कंपनीसोबत करार झाला होता. भविष्यात कधीही या भागावर रायकर यांची कंपनी हक्क सांगणार नाही, बांधकाम, डेव्हलपमेंटचे हक्क मागणार नाही, असा करार झाला होता. म्हणजे उर्वरित मैदान हे महापालिकेचे झाले होते. रविंद्र वायकर यांनी २०२१ मध्ये ही बाब मुंबई महापालिकेपासून लपवून पालिकेची फसवणून केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

याप्रकरणी सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. रायकर यांनी केलेली फसवणूक मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांना तसंच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती होती. तरी देखील ५०० कोटींचे हॉटेल उभारायला ही जागा वापरण्यासाठी उद्धव ठाकरे तसंच महापालिकेच्या परवानगीने दिली, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याविषयी गेल्या २ वर्षापासून मुंबई महापालिका व राज्य सरकारशी पाठपुरावा करित होतो. याता सप्टेंबर २०२३ नंतर चौकशी सुरु झाली असून महापालिकेने रायकर यांना नोटीत देत स्पष्टीकरण मागले असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in