राज ठाकरेंच्या भूमिकेचे पक्षात पडसाद; कीर्तिकुमार शिंदे यांचा राजीनामा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर त्याबाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
राज ठाकरेंच्या भूमिकेचे पक्षात पडसाद; कीर्तिकुमार शिंदे यांचा राजीनामा

प्रतिनिधी/मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याचे संमिश्र पडसाद आता पक्षात उमटायला सुरूवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्येही नाराजीची भावना असल्याचे समजते. आता मनसे नेते कशाप्रकारे ही नाराजी दूर करणार की पक्षात पडसाद उमटत राहणार, हे पाहावे लागणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर त्याबाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यानंतर आता पक्षातीलच अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याविरोधात नाराजी व्यक्त करताना स्थानिक नेत्यांकडे आपली नाराजी कळवत पक्षाचे व्हॉटसग्रुपही सोडल्याचे समजते.

बुधवारी सकाळीच मनसेचे सरसिटणीस आणि अमित ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे कीर्तीकुमार शिंदे यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. ‘अलविदा मनसे’ या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपला राजीनामा जाहीर केला. “आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा, त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबना होते. त्याचे काय?” असा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in