किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी!

एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्तादेखील नमूद करण्यात आला आहे
किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी!
ANI

महाराष्ट्रात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असताना दुसरीकडे मुंबईच्या महापौरी किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्तादेखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकीपत्राची चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ५० आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असताना किशोरी पेडणेकर यांना ही धमकी आली आहे. “मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवले होते. तुला जे करायचे ते कर. उद्धव ठाकरेंना सांग,’’ असे या पत्रात म्हटले आहे.

अजित पवारांच्या नावाचाही उल्लेख

दरम्यान, या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “आमच्या अजित पवारांच्या जीवावर मुख्यमंत्री झाला आहेस. जास्त माज करू नकोस, अस उद्धव ठाकरेला सांग”, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in