दसरा मेळाव्यात आवाज किशोरी पेडणेकरांचा!

शिवतीर्थावर घुमला तर बीकेसीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाजाच्या बाबतीत बाजी मारली.
दसरा मेळाव्यात आवाज किशोरी पेडणेकरांचा!

दसरा मेळाव्यानिमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाने आपली ताकद राज्यातील जनतेला दाखवून दिली. शिवतीर्थ आणि बीकेसीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा ‘आवाज’ शिवतीर्थावर घुमला तर बीकेसीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाजाच्या बाबतीत बाजी मारली.

शिवाजी पार्क मैदानात आवाजाची मर्यादा १०१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली. त्यातुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात आवाजाची मर्यादा काहीशी कमी म्हणजेच ९१.६ डेसिबलपर्यंत नोंदवली गेली. शिवाजी पार्क हा निवासी झोनमध्ये येत असल्याने येथे ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानाच्या आजूबाजूला ६५ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा आहे; पण शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ९१.६ डेसिबल आवाज नोंदवण्यात आल्याचे ध्वनी प्रदूषणाच्याविरोधात लढणाऱ्या आवाज फाऊंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सुमेरा अब्दुल्ली यांनी सांगितले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अन्य नेत्यांचा आवाज मोठा होता; मात्र एमएमआरडी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज अधिक होता. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज ८८.५ डेसिबल नोंदवण्यात आला. तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सर्वाधिक म्हणजेच ९७ डेसिबल आवाज नोंदवण्यात आला. अंबादास दानवे यांचाही ९६.६ डेसिबल आवाज नोंदवण्यात आला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ८९.६ डेसिबल आवाज नोंदवण्यात आला. हा आवाज येथे भाषण करणाऱ्या अन्य नेत्यांपेक्षा जास्त होता. किरण पावस्कर व धैर्यशील माने यांचा आवाज ८८.५ डेसिबल इतका गेला होता. गुलाबराव पाटलांचा ८६ डेसिबल आवाज पोहोचला होता.

उद्धव ठाकरे गट

किशोरी पेडणेकर ९७.0 डेसिबल

नितीन देशमुख ९३.५ डेसिबल

अंबादास दानवे ९६.६ डेसिबल

सुषमा अंधारे ९३.६ डेसिबल

भास्कर जाधव ९२.२ डेसिबल

उद्धव ठाकरे ८८.४ डेसिबल

एकनाथ शिंदे गट

किरण पावस्कर ८८.५ डेसिबल

शहाजी पाटील ८२.४ डेसिबल

राहुल शेवाळे ७८.८ डेसिबल

धैर्यशील माने ८८.५ डेसिबल

शरद पोंक्षे ८२.८ डेसिबल

गुलाबराव पाटील ८६.0 डेसिबल

रामदास कदम ८४.२ डेसिबल

एकनाथ शिंदे ८९.६ डेसिबल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in