Kishori Pednekar : किशोरी पेंडणेकर यांच्या अडचणीत वाढ! मुंबई सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला

न्यायालयाने किशोरी पेंडणेकर यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
Kishori Pednekar : किशोरी पेंडणेकर यांच्या अडचणीत वाढ! मुंबई सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर(Kishori Pednekar ) यांच्या अडचणीत काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबईच्या सत्र न्यायालयाने(mumbai sessions court) किशोरी पेंडणेकर यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पेंडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

कोरोनाकाळात(Corona) मुंबई महापालिकेत मृतदेह ठेवण्यासाठी झालेल्या बॅग खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्यांच्यासह ठेकेदार कंपनी असलेल्या वेदांताच्या संचालकांचाही समावेश आहे.

दरम्यान, किशोरी पेंडणेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. किशोरी पेंडणेकर यांच्या सोबत वेदांतानं देखील अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, किशोरी पेंडणेकर यांच्यासह वेदांताचा देखील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार कायम राहणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in