पालिका शाळांतील टेरेसवर किचन गार्डन दादर मधील शाळेत प्रयोग ; १०० शाळांमध्ये संकल्पना राबवणार

हा उपक्रम राबवण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या असून कंत्राटदाराला या किचन गार्डनचा विकास, नियोजन आणि देखरेख असे काम करावे लागणार आहे.
पालिका शाळांतील टेरेसवर किचन गार्डन
दादर मधील शाळेत प्रयोग ; १०० शाळांमध्ये संकल्पना राबवणार
PM

मुंबई : पालिका शाळांतील टेरेसवर किचन गार्डन ही थीम राबवा, असे निर्देश मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर दादरमधील वुलनमिल पालिका शाळेत प्रयोग यशस्वी झाल्याने आता अन्य १०० शाळांतील टेरेसवर किचन गार्डन संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी शाळा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात शाळांतील टेरेसवर फळभाज्या पालेभाज्या पिकणे शेतीविषयक धडे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका शाळेच्या इमारतींवर टेरेस गार्डन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड केली जाणार असून या भाज्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या मधान्य भोजनात करण्याचा विचार पालिकेच्या शिक्षण विभागाचा आहे. यासाठी जिल्हा नियोजनकडून पालिकेला एक कोटींचा निधी मिळणार असून, इतर खर्च पालिका करणार आहे .

हा उपक्रम राबवण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या असून कंत्राटदाराला या किचन गार्डनचा विकास, नियोजन आणि देखरेख असे काम करावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी उपक्रम!

-सध्या फास्टफुडच्या आहारी जाणार्‍या विद्यार्थ्यांना ऑरगॅनिक शेतीची माहिती मिळणार.

-विद्यार्थ्यांना भाज्यांची लागवड, वाढ समजाणार असल्याने शेतीची माहितीही मिळणार आहे.

-शाळेच्या इमारतीच्या टेरेसवर भाज्यांचा मळा फुलणार असल्याने आकर्षक उद्यान निर्माण होणार.

-टेरेस गार्डनुमुळे शाळा परिसरात शुद्ध हवा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in