शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेवर चाकूहल्ला

शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेवर चाकूहल्ला करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे.
शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेवर चाकूहल्ला
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेवर चाकूहल्ला करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. प्रकाशकुमार योगिंदरकुमार मांझी असे या आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव असून, हल्ल्यानंतर तो बिहारला पळून गेला होता. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रकाशकुमार आणि तक्रारदार महिला मालाडच्या मढ परिसरात राहत असून, ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. ही महिला मढच्या व्यासवाडी, शास्वत फिल्म प्रोडेक्शन हाऊसमध्ये केअरटेकर म्हणून काम करते, तर प्रकाशकुमार हा तिथे असलेल्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सोमवारी दुपारी त्याने तिला मांजरीचा बहाणा करून बंगल्यामध्ये बोलाविले होते. तिथे त्याने तिच्याशी अश्‍लील लगट करून तिचा विनयभंग केला. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिच्यावर चाकूने वार केले होते. त्यात तिच्या मानेला आणि पोटाला दुखापत झाली होती. ही माहिती महिलेकडून समजताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले. घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून तिने प्रकाशकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. प्रकाशकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. बिहारला प्रकाशकुमार हा त्याच्या बहिणीकडे लपून बसला होता, तिथे पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in