Mumbai : मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो लक्ष द्या; उद्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येऊन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहचतील.

हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

logo
marathi.freepressjournal.in