शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी! ‘शिवाजी पार्क गणेश मंडळा’चा आगळा उपक्रम

दादर येथील शिवाजी पार्क हाऊस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी नेण्याविषयीचा अनोखा देखावा साकारला आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तरुण पिढी ज्ञानसमृद्ध होऊ शकते, हा देखावा गणेश भक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी! ‘शिवाजी पार्क गणेश मंडळा’चा आगळा उपक्रम
Published on

भटक्या विमुक्त जाती आणि लोककलाकारांना आपल्या कामासाठी तसेच पोटासाठी कराव्या लागणाऱ्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अनेक अडीअडचणी उद‌्भवतात. त्यामुळे हा वर्ग मोठ्या प्रमाणात शिक्षणापासून वंचित राहतो. नव्या शैक्षणिक धोरणामुळे अशा वर्गाला ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण शिक्षण देऊन त्यांना समृद्ध करू शकतो. हाच विचार घेऊन यंदा शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा देखावा साकारला आहे.

आदिवासी लोककलाकारांना लोककलेच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा घेऊन नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली तर तेदेखील या आधुनिक युगात मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात, असा विश्वास कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी दै. ‘नवशक्ति'शी बोलताना व्यक्त केला. डोंबारी लोककलेतून कसरत दाखविणारी मुलं उत्तम खेळ खेळणारे क्रीडापटू, निसर्गाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या ऊसतोड कामगारांची मुलं नैसर्गिक औषधोपचार माहीत असणारे डॉक्टर, पारंपरिकता जपणारी मुलं उत्तम जेवण बनवणारे आचारी असे एक आणि अनेक अवलिया आपल्या देशाला मिळू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी! ‘शिवाजी पार्क गणेश मंडळा’चा आगळा उपक्रम
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

आदिवासी संस्थांना करणार मदत

यंदा शिवाजी पार्क हाऊस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ५१ वे वर्ष असून गणेश मूर्ती संपूर्ण शाडू मातीची पर्यावरणस्नेही आहे, तर सजावट संपूर्ण पर्यावरणपूरक आहे. यंदा मंडळाच्या माध्यमातून शालोपयोगी वस्तू व अन्य मदत भटक्या विमुक्त जाती-जमातीसाठी काम करणाऱ्या संस्थांना दिली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in