

मुंबई : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक सर्जरी यशस्वीपणे केली आहे. ही सर्जरी मुंबईत दोन रुग्णांवर केली गेली, तर ऑपरेटिंग सर्जन्स डॉ. टी. बी. युवराजा हे शांघायमध्ये होते. सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर, भारतात ‘तौमाई®’ (Toumai®) रिमोट रोबोटिक सर्जरी सिस्टीमचा हा पहिलाच, देशाच्या सीमेपलीकडे करण्यात आलेला क्लिनिकल उपयोग आहे. हे यश देशाच्या रिमोट सर्जरी मेडिकल क्षमतांमध्ये घडून येत असलेली महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते.
ही ऐतिहासिक प्रक्रिया मुंबईत दोन रुग्णांवर केली गेली. ज्यात रोबोटच्या मदतीने ‘रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी’ आणि ‘पार्शियल नेफ्रेक्टॉमी’ यशस्वीपणे करण्यात आली. ही गुंतागुंतीची युरोलॉजिकल सर्जरी ५ हजार किमीपेक्षा जास्त दूर बसलेल्या एका तज्ञ सर्जनने रिमोटने संचालित केली. ही बाब गुंतागुंतीच्या सर्जरी मेडिकल प्रक्रियांसाठी, दूरवरून रोबोटिक वापर सुरक्षितपणे, अचूकपणे आणि विश्वसनीय पद्धतीने करता येतो हे प्रमाणित करते. दोन्ही सर्जरी तौमाई® (Toumai®) सिस्टीमचा उपयोग करून रिमोट पद्धतीने करण्यात आल्या.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये युरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे डायरेक्टर (ग्रुप), डॉ. टी. बी. युवराजा यांनी या सर्जरी दूरवरून केल्या. त्यांनी याआधी ४१०० पेक्षा जास्त रोबोटिक प्रक्रिया केल्या आहेत. या यशाबाबत, डॉ. युवराजा यांनी सांगितले, ‘रिमोट रोबोटिक सर्जरीमध्ये उच्च गुणवत्तापूर्ण सर्जिकल देखभालपर्यंत पोहोच पूर्णपणे बदलण्याची क्षमता आहे. दोन मोठ्या देशांमध्ये या प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलची नावीन्य, सुरक्षा आणि रुग्णांची उत्कृष्ट देखभाल यांच्याप्रति बांधिलकी अधिक जास्त मजबूत झाली आहे.’
कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, ‘सीडीएससीओने तौमाई® प्रणालीला मान्यता दिल्यानंतर, आंतरखंडीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करणारे भारतातील पहिले रुग्णालय बनणे ही आमच्या हॉस्पिटलसाठी आणि भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. ही ऐतिहासिक कामगिरी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आणि भारतातील शस्त्रक्रिया काळजीचे भविष्य घडवण्यात हॉस्पिटलच्या नेतृत्वाला आणखी बळकटी देते.’