कोल्हापूरच्या शाही दसरा मेळाव्यात आता शासनाचाही सहभाग - केसरकर

साताऱ्यालादेखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरा आजही पाळल्या जातात.
कोल्हापूरच्या शाही दसरा मेळाव्यात आता शासनाचाही सहभाग - केसरकर

कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात आता शासकीय सहभागदेखील असणार आहे. शाही दसरा महोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी २५ लाख रुपये राज्य शासनाकडून देण्यात येणार असून, पुढच्या वर्षी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कोल्हापूरसोबतच सातारा येथेही गादी आहे. साताऱ्यालादेखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरा आजही पाळल्या जातात. उत्सव साजरे केले जातात. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करून सातारा येथेही अशाच प्रकारे उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे; मात्र तो स्थानिक पातळीवरच जास्त माहिती आहे. कोल्हापूरची संस्कृती समृद्ध आहे. शाहू महाराजांचा मोठा वारसा आहे. त्याचसोबत देवी महालक्ष्मीचे देऊळ, कुस्ती, मैदानी खेळ, कोल्हापूरची खाद्य संस्कृती आदी सर्वच बाबींना जागतिक स्तरावर या माध्यमातून नेता येऊ शकते. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. या महोत्सवाला केवळ राज्यातूनच नाही, तर देशभरातून नागरिक येतील, असाही प्रयत्न करण्यात येईल.

कोल्हापूरसोबतच सातारा येथील गादीही प्रसिद्ध आहे. सातारा येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरा पाळल्या जातात. सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येतात. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत चर्चा करून सातारा येथेही अशाच प्रकारे उत्सव साजरा करता येईल का? याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in