कोंडिविटा तरणतलाव नव्हे, छत्रपती संभाजी महाराज तरणतलाव; २ एप्रिलपासून स्विमिंग सुविधा; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

कोंडिविटा अंधेरी (पूर्व) येथील तरणतलाव पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील योग्य समन्वयामुळे अवघ्या १७ महिन्यांत तयार झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस असल्याने या तरणतलावाचे नामकरण...
कोंडिविटा तरणतलाव नव्हे, छत्रपती संभाजी महाराज तरणतलाव; २ एप्रिलपासून स्विमिंग सुविधा; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

मुंबई : कोंडिविटा अंधेरी (पूर्व) येथील तरणतलाव पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील योग्य समन्वयामुळे अवघ्या १७ महिन्यांत तयार झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस असल्याने या तरणतलावाचे नामकरण 'छत्रपती संभाजी महाराज तरण तलाव' असे करण्यात येत असल्याचे राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तसेच मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले.

दरम्यान, २ एप्रिलपासून तरण तलावात स्विमिंगची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती सह आयुक्त रणजित ढाकणे यांनी दिली. यावेळी स्थानिक आमदार पराग अळवणी, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजीत ढाकणे, के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू आदी मान्यवर उपस्थित होते.

पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार व मान्यतेनुसार या तरण तलावासाठी ६ मार्चपासून ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा पहिलाच तरण तलाव असल्याचे ढाकणे यांनी नमूद केले. के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांनी आभार व्यक्त केले.

सहा दिवसांत २८०० नागरिकांची नोंदणी!

तरणतलावासाठी ६ मार्च २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ही नोंदणी सुरू आहे. २ एप्रिलपासून हा तलाव नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत तब्बल २८०० नागरिकांनी या तरणतलावासाठी नोंदणी केली आहे.

‘असे’ आहे तरणतलाव

अंधेरी (पूर्व) येथील तरणतलाव एकूण ३१६० चौरस मीटर जागेत बांधण्यात आला आहे. तसेच १३०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तलाव परिसरात उद्यान साकारले आहे. १८६० चौरस मीटर क्षेत्रफळावर २५ बाय १५ मीटर आकाराचा तरणतलाव आहे. तसेच महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहेत. महिलांसाठी देखील स्वतंत्र तुकडी राहणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in