कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी! बोरिवलीत २६ तारखेपासून मालवणी महोत्सव

मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ ऑक्टोबरपासून बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी! बोरिवलीत २६ तारखेपासून मालवणी महोत्सव
Published on

मुंबई : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ ऑक्टोबरपासून बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिराच्या प्रतिकृती तयार करण्यात आली असून महाआरती तसेच पारंपरिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात येणार आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे २८ वे वर्ष असून २ नोव्हेंबरपर्यंत कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. रोज सायंकाळी ७वाजता श्री देव वेताळाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजता दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे बालनगरी व बाजारपेठेचेही आयोजन करण्यात आले आहे.

या मालवणी महोत्सवाचा कै. अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर आणि माजी आमदार विलास पोतनीस यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून मुहूर्त करण्यात आला आहे, अशी माहिती उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in