आधी नक्षलवादी जिंकायचे, आता पोलीस जिंकतात - के. पी. रघुवंशी

महाराष्ट्रातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी माजी आयपीएस अधिकारी के. पी. रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली ‘क्रॅकिंग-६०’ म्हणजेच ‘सी-६०’ फोर्स स्थापन करण्यात आली. १०० स्थानिक तरुणांची भरती करून त्या पथकाला केंद्र सरकारच्या ‘ग्रेहाऊंड्स’ (केंद्र सरकारने स्थापन केलेली एक एलिट फोर्स)कडून प्रशिक्षण देण्यात आले.
आधी नक्षलवादी जिंकायचे, आता पोलीस जिंकतात - के. पी. रघुवंशी
आधी नक्षलवादी जिंकायचे, आता पोलीस जिंकतात - के. पी. रघुवंशी
Published on: 

किरण तारे / मुंबई

महाराष्ट्रातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी माजी आयपीएस अधिकारी के. पी. रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली ‘क्रॅकिंग-६०’ म्हणजेच ‘सी-६०’ फोर्स स्थापन करण्यात आली. १०० स्थानिक तरुणांची भरती करून त्या पथकाला केंद्र सरकारच्या ‘ग्रेहाऊंड्स’ (केंद्र सरकारने स्थापन केलेली एक एलिट फोर्स)कडून प्रशिक्षण देण्यात आले. त्या जोडीला अत्यंत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली. त्यामुळे नक्षलवादविरोधातला लढा यशस्वी झाला. ‘जो आधी गोळी झाडेल तोच जिंकेल अशी परिस्थिती असल्यामुळे आधी नक्षलवादी जिंकायचे, आता पोलीस जिंकतात!’ अशी ‘सी-६०’ फोर्स स्थापन करण्यामागची कहाणी माजी आयपीएस अधिकारी के. पी. रघुवंशी यांनी उलगडली.

महाराष्ट्राला १ ऑक्टोबरला ‘नक्षलवादमुक्त राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा के. पी. रघुवंशी यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचा ओघ दिसून आला. निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला असे वाटले की, हा क्षण दीर्घकाळ स्मरणात ठेवावा असा आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध सशस्त्र लढ्यासाठी स्थापन करण्यात आलेली त्यांची ‘सी-६०’ ही विशेष फौज या यशामागील मुख्य शिलेदार होती. महाराष्ट्रात १९९० च्या उत्तरार्धात के. पी. रघुवंशी यांची मुंबईहून गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून बदली झाली. गडचिरोली परिसराचा चार महिने अभ्यास केल्यानंतर रघुवंशी यांच्या लक्षात आले की, स्थानिकांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय नक्षलवादाचे उच्चाटन करणे शक्य नाही. त्यांनी पोलीस दलाला सहकार्य करण्यासाठी प्रवृत्त केले.

स्थानिक तरुणांची विशेष फौज

रघुवंशी यांनी स्थानिक तरुणांचे एक असे दल तयार करण्याचा निर्णय घेतला, जे नक्षलवाद्यांच्या घरच्या अंगणात म्हणजेच जंगलात जाऊन त्यांच्याशी लढा देऊ शकतील. त्यांनी १०० तरुणांची एक विशेष टीम तयार केली. त्यापैकी प्रत्येकी ३० तरुण गडचिरोली आणि अहेरी येथे तैनात करण्यात आले. त्या काळांत एके-४७ ही अस्सल रायफल बाजारात नवीन होती. हे आधुनिक आणि अत्याधुनिक शस्त्र महाराष्ट्रातील केवळ दोनच दलांना दिले गेले होते - एक मुंबई पोलीस आणि दुसरे गडचिरोली पोलीस.

सी फोर्सची स्थापना

एका प्रसंगी रघुवंशी यांनी स्थानिकांना त्यांच्या सुंदर परिसराला हिंसाचाराच्या खाईत ढकलल्याबद्दल नक्षलवाद्यांविरुद्ध बदला घेण्याची आठवण करून दिली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि अखेर ‘सी-६०’ फोर्सच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

केंद्र सरकारकडून प्रशिक्षण

'या मुलांना वेगळा गणवेश देण्यात आला. मी त्यांना सांगितले की, तुम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लाडके आहात. त्यांना प्रशिक्षणासाठी ‘ग्रेहाऊंड्स’ (केंद्र सरकारने स्थापन केलेली एक एलिट फोर्स)कडे पाठवण्यात आले. डीजीपी सराफ यांनी आमच्या फोर्सचे नाव ‘क्रॅकिंग-६०’ असे ठेवले, ज्यावरून पुढे ती ‘सी-६०’ फोर्स म्हणून ओळखली जाऊ लागली,' असे के. पी. रघुवंशी यांनी सांगितले.

‘सी-६०’ ची निर्मिती कशी झाली?

तत्कालीन पोलीस महासंचालक (डीजीपी) वसंत सराफ यांनी रघुवंशी यांना नक्षलवाद समजून घेण्यासाठी ‘स्टार ओव्हर चायना’ नावाचे पुस्तक दिले होते. ते गडचिरोलीत पोहोचले तेव्हा महाराष्ट्र सरकारने विशेष कृती आराखडा तयार केला. त्यात एक विकासासाठी आणि दुसरा पोलीस दल बळकट करण्यासाठी प्रमुख भाग होते. त्यांना समजले की, नक्षलवादी तिथे कोणताही विकास होऊ देत नव्हते. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नव्हता. ते वेगळ्या पद्धतीने काम करत होते. सर्व अधिकारी बाहेरील असल्यामुळे स्थानिकांच्या मनात पोलिसांविषयी कोणतीही आपुलकी नव्हती.

पहिले मोठे यश १९९२ मध्ये

‘सी-६०’ फोर्सला त्यांचे पहिले मोठे यश १९९२ मध्ये मिळाले तेव्हा त्यांनी चकमकीत ‘दलम् कमांडर’ संतोषला ठार केले. चकमकीच्या दोन महिने आधी रघुवंशी यांची गडचिरोलीतून बदली झाली होती. 'कोणाचाही जीव घेणे हा कोणत्याही मानवासाठी आनंदाचा विषय नसतो. परंतु जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करत असता तेव्हा जो आधी गोळी झाडेल तोच विजेता ठरतो. सुरुवातीला नक्षलवादी विजेते होते. आता मात्र पोलीस जिंकतात,' असे रघुवंशी म्हणाले. पहिली चकमक ते ‘सी-६०’ शौर्यचक्र, पोलीस पदकांसह ३०० हून अधिक शौर्य पदके पटकावली आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in