कुर्ला -अंधेरी मार्ग होणार पूर्णपणे मोकळा;रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु

रस्ता विस्तारीकरणात अनेक गाळे आणि मोठी झाडे जेसीबीने हटवण्यात आल्यामुळे साकीनाका पर्यंतचा मार्ग पूर्ण खुला झाला
कुर्ला -अंधेरी मार्ग होणार पूर्णपणे मोकळा;रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु

कुर्ला -अंधेरी मार्ग म्हणजे वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू हा रस्ता रस्ता वाहनांच्या वर्दळीत तासनतास वाहतूक कोंडीत मुंबईकर प्रवासी हैराण होत असतात. मात्र आता हा मार्ग पुढील काही दिवसांत पूर्णपणे मोकळा झाल्याचे दिसणार आहे. आमदार दिलीप लांडे यांच्या अथक प्रयत्नांतून गेली २५ वर्षांपासून रखडलेला रस्ता रुंदीकरणाचा मार्ग लांडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षभरात टप्याटप्याने रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. गेल्या चार टप्यानंतर सफेद पूल पाचव्या टप्यातील रस्ता रुंदीकरणाचे काम आमदार दिलीप लांडे यांनी हाती घेतले आहे. या रस्ता विस्तारीकरणात अनेक गाळे आणि मोठी झाडे जेसीबीने हटवण्यात आल्यामुळे साकीनाका पर्यंतचा मार्ग पूर्ण खुला झाला आहे. त्यामुळे काही दिवसांत या रस्त्यावर डांबरीकारण करून मार्ग जलद गतीने वाहतुकीला उपलब्ध असेल. आमदार दिलीप लांडे यांनी रस्ता विस्तारीकरणाच्या ठिकाणी उपस्थित राहून चालू असलेल्या कामाचा आढावा घेत मनपाच्या अधिकाऱ्यांना संबंधित कामासंदर्भात निर्देश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in