कुर्ल्यातील कंपनीच्या सर्व्हरमध्ये सायबर हॅकरची घुसखोरी; बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी

सायबर हॅकर्सनी ‘ॲल्केमिस्ट मार्केटिंग टॅलेंट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या जाहिरात कंपनीच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी करून महत्त्वाची माहिती चोरली आणि ४.१२ लाख रुपयांची बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणी मागितली आहे.
कुर्ल्यातील कंपनीच्या सर्व्हरमध्ये सायबर हॅकरची घुसखोरी; बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी
Published on

मेघा कुचिक / मुंबई

सायबर हॅकर्सनी ‘ॲल्केमिस्ट मार्केटिंग टॅलेंट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या जाहिरात कंपनीच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी करून महत्त्वाची माहिती चोरली आणि ४.१२ लाख रुपयांची बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणी मागितली आहे. कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी अंतर्गत प्रणालीमध्ये लॉगिन करू शकत नसल्याने ही घटना उघडकीस आली. पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न करताना त्यांना सर्व्हरवरील सगळी माहिती गायब झाल्याचे लक्षात आले.

नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, ही कंपनी कुर्ला पश्चिम येथे स्थित आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना सर्व्हरमध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यानंतर सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आणि तपासात स्पष्ट झाले की, हॅकर्सनी नेटवर्क अटॅच्ड स्टोरेजमध्ये घुसून सर्व फाईल्स एन्क्रिप्ट केल्या आहेत.

त्यानंतर कंपनीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणी मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in