लालबागचा राजा मंडळात पहिल्याच दिवशी धक्काबुक्की

मुंबईतील गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे
लालबागचा राजा मंडळात पहिल्याच दिवशी धक्काबुक्की

मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ दरवर्षी या ना कारणांने वादात असते. यंदाही पहिल्याच दिवशी एका महिला भाविकाला सुरक्षारक्षक महिलेने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

गेली दोन वर्ष कोविड मुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. त्यांना सर्व निर्बंध हटवले गेल्यामुळे मुंबईतील गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. बुधवारी सकाळपासून भक्तांनी येथे मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एक महिला भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मुखदर्शनासाठी जास्त वेळ रांगेत थांबू द्यावे, असा या महिलेचा आग्रह होता. पण सुरक्षारक्षकाने नकार दिल्यामुळे त्यांच्या शाब्दिक चकमक उडाली. हा वाद विकोपाला गेल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत महिला भाविकांनी सुरक्षारक्षकांना बाजूला केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ हे चिंचोळ्या जागेत असल्यामुळे येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. यावरून येथील स्वयंसेवक कार्यकर्ते आणि भाविक यांच्यात नेहमीच वाद होत असतात. अनेकदा येथील प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत गेली आहेत. गुन्हे देखील दाखल झाले आहेत यंदा तर वादानेच येथील उत्सवाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in