Lalbagcha raja : लालबागचा राजाच्या चरणी लाखोंचं दान ; व्हिडिओ आला समोर

भक्तांनी लाखो रुपये किमतीचे दान, दागिने गणरायाच्या पायाशी अर्पण केले असून त्याची मोजणी देखील केली जातं आहे.
Lalbagcha raja : लालबागचा राजाच्या चरणी लाखोंचं दान ; व्हिडिओ आला समोर

राज्यभर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. लोकं प्रत्येक ठिकाणी जाऊन गणरायाचं दर्शन घेतं आहेत. अशातच मुंबईतील लालबागच्या राज्याच्या चरणी प्रत्येक वर्षी भरभरून दान लोकं देतात. या सगळ्या दानाची मोजणी केली जाते. गणेशोत्सवाच्या पहिल्याचं दिवशी तब्बल २५ लाखांहून अधिक भाविकांनी लालबागच्या राज्याचे दर्शन घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावेळी सर्व भक्तांनी लाखो रुपये किमतीचे दान, दागिने गणरायाच्या पायाशी अर्पण केले असून त्याची मोजणी देखील केली जातं आहे.

मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबईमधील तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. फक्त सामान्य नागरिक नाहीत तर अनेक बॉलीवूड कलाकर, क्रिकेटर्स यांच्यासह इतर प्रसिद्ध लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजेरी लावतात. हेच भाविक राजाच्या चरणी भरभरून दान देखील देतात. यावेळी रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तूंसह अनेक गोष्टी दान केल्या जातात. राजाच्या चरणी किती दान केलं यांची मोजणी करण्यात येते.

मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश चतुर्थीनिमित्त देण्यात आलेल्या या दानाची मोजणी केली जात असतानाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दान केलेल्या वस्तूत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, इतर वस्तु दिल्याचे पहायला मिळत आहे. मंडळाचे कर्मचारी या वस्तूंची काळजीपूर्वक मोजणी करताना या व्हिडिओत दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in